एसबीआय पर्सनल लोन 2022: व्याजदर, पात्रता | SBI Personal Loan In Marathi

मित्रांनो, आजच्या काळात पैसा ही एक अशी गोष्ट आहे की त्याचा वापर करून आपल्याला पाहिजे असलेले प्रत्येक काम करू शकतो पण जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही काहीही करू शकत नाही. तसेच, तुम्ही सर्वजण पैसे कमावण्यासाठी कुठेना कुठे नोकरी करत असाल किंवा काही छोटे मोठे काम करत असाल. पण एवढे काम करूनही महिन्याकाठी आपल्याकडे पैसे उरत नाहीत. मग अशा परिस्थितीत विचार पडतो की घर चालवायचे तरी कसे व जी स्वप्ने पूर्ण करायची आहेत त्यासाठी लागणार पैसा उभा तरी कसा करायचा आणि नातेवाईकही काही मदत करू शकत नाहीत. मग अशा वेळी एकच मदतीचा हात असतो तो म्हणजे बँक लोन (Bank Loan). 

एसबीआय पर्सनल लोन

तर आजची पोस्ट काळजीपूर्वक वाचत रहा कारण मी तुमच्यासाठी असे कर्ज घेऊन आलो आहे की जे तुम्ही सहजपणे घेऊ शकता. तर  मित्रांनो ज्या बँकेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तीचे नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) जीला शॉर्टमध्ये एसबीआई (SBI) पण म्हणतात. आणि या बँकेकडून तुम्हाला पर्सनल लोन (SBI Personal Loan) मिळेल.   

तर आज तुम्हा सर्वांना या पोस्टमध्ये माहित मिळणार आहे की तुम्ही एसबीआई (SBI) कडे कर्जासाठी अर्ज कसा करू शकता, तुम्हाला एसबीआई (SBI) कडून कर्ज घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असेल, कोणाला स्टेट बँक ऑफ इंडिया कडून कर्ज (SBI Personal Loan) मिळू शकते, त्यासाठी काय नियमावली आहे, तुम्हाला एसबीआई कडून मिळणाऱ्या कर्जावर व्याजदर (Rate of Interest) किती असेल, तुम्हाला कर्जाची परत फेड करण्यासाठी किती वेळ मिळेल व तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया कडून कर्ज घेण्याचे काय फायदे आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे या पोस्टद्वारे मिळणार आहेत, तर आता आपण ह्या प्रत्येक गोष्ट तपशीलवार जाणून घेऊया.

Table of Contents

एसबीआय पर्सनल लोनची वैशिष्ट्ये (SBI Personal Loan Benefits)

  • कर्जाची रक्कम (Loan Amount): एसबीआय पर्सनल लोन (SBI Personal Loan) चा वापर करून तुम्ही 20 लाखापर्यंतच्या प्रत्येक वैयक्तिक गरजा पूर्ण करू शकता.  
  • कर्ज योजना (Loan scheme): एसबीआय (sbi) पेन्शनर, पगारदार आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी दरवेळी विशेष कर्ज योजना (Loan scheme) देते 
  • सुलभ कालावधी (Easy Time Period): एसबीआय वैयक्तिक कर्ज (sbi personal loan) निवडल्यास आपल्याला 6 महिने ते 6 वर्षे कालावधीत परतफेड करू शकता. 
  • कर्जासाठी सहज अर्ज: एसबीआय वैयक्तिक कर्जासाठी (sbi personal loan) कमी वेळेत आणि मोजक्या कागदपत्रांसोबत सहज अर्ज करू शकता.

एसबीआय पर्सनल लोनचे प्रकार (SBI Personal Loan Types)

1. एसबीआय एक्सप्रेस क्रेडिट लोन (SBI Xpress Credit Loan): 

पात्रता (Eligibility of SBI Xpress Credit Loan)

  • एसबीआय सैलरी अकाउंट (SBI Salary Accounts) आवश्यक आहे. 
  • कमीत कमी महिना 15,000 रुपये इनकम असणे आवश्यक आहे.

वैशिष्टे (Features of SBI Xpress Credit Loan)

  • कर्जाची रक्कम 25,000 ते 20 लाख रु. पर्यंत आहे.  
  • कर्जाचा कालावधी 6 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंत आहे. 
  • व्याजदर (Rate of Interest) 10.60% ते 13.10% पर्यंत.

2. एक्सप्रेस एलीट स्कीम पर्सनल लोन (Xpress Elite Scheme Personal Loan): 

पात्रता (Eligibility of Xpress Elite Scheme Personal Loan)

  • एसबीआय सैलरी अकाउंट (SBI Salary Accounts) आवश्यक आहे. 
  • कमीत कमी महिना 15,000 रुपये इनकम असणे आवश्यक आहे. 

वैशिष्टे (Features of Xpress Elite Scheme Personal Loan)

  • कर्जाची रक्कम 25,000 ते 20 लाख रु. पर्यंत आहे.  
  • कर्जाचा कालावधी 6 महिन्यांपासून ते 60 महिन्यांपर्यंत आहे. 
  • व्याजदर (Rate of Interest) 9.60% – 11.35% पर्यंत.

3. एसबीआय एक्सप्रेस बंधन पर्सनल लोन (SBI Xpress Bandhan Personal Loan): 

पात्रता (Eligibility Of SBI Xpress Bandhan Personal Loan)

  • ज्यांचे एसबीआय सैलरी अकाउंट (SBI Salary Accounts) नाही. 
  • महिना किमान एकूण 50,000 रुपये इनकम असणे आवश्यक आहे. 
  • मासिक इनकमचा 50% पेक्षा जास्त EMI पेमेंटसाठी जात नसावा.  

वैशिष्टे (Features Of SBI Xpress Bandhan Personal Loan)

  • हे लोन केवळ केंद्र/ राज्य सरकार/ संरक्षण आणि राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आणि विशेष रेटेड कॉर्पोरेट्स यांच्यासाठी 
  • व्याजदर (Rate of Interest) 11.50% – 13.85% पर्यंत.
  • मुदत कर्ज किंवा ओव्हरड्राफ्ट दोन्ही स्वरूपात उपलब्ध.
  • किमान मुदत कर्जाची रक्कम: 25,000 रुपये, कमाल मुदत कर्जाची रक्कम: तुमच्या मासिक उत्पन्नाची 24 पट (कमाल कर्जाची रक्कम जी 15 लाख रुपये मिळू शकते)
  • किमान ओव्हरड्राफ्ट रक्कम: 5 लाख रुपये, जास्तीत जास्त ओव्हरड्राफ्ट रक्कम: तुमच्या मासिक उत्पन्नाच्या 24 पट (कमाल कर्जाची रक्कम जी 15 लाख रुपये मिळू शकते)

4. एसबीआय पेंशन लोन (SBI Pension Loan): 

पात्रता (Eligibility of SBI Pension Loan)

  • तुम्ही केंद्र / राज्य किंवा संरक्षण निवृत्तीवेतनधारक (किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक) असणे आवश्यक आहे. संरक्षण पेन्शनधारकांमध्ये आर्मी, नेव्ही, एअर फोर्स, पॅरा मिलिटरी फोर्सेस (सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी इ.), तटरक्षक दल, राष्ट्रीय रायफल्स आणि आसाम रायफल्स यांचा समावेश आहे.
  • निवृत्तीवेतनधारकाचे वय 76 वर्षांपेक्षा जास्त नसावे. 
  • एसबीआय पेंशन लोन योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कर्ज 14 लाख पर्यंत मिळू शकते. 

वैशिष्टे (Features of SBI Pension Loan)

  • संरक्षण खात्यातील निवृत्तीवेतनधारकांसाठी कोणतेही प्रोसेसिंग शुल्क नाही.
  • पेन्शन खात्यातून (EMI) शुल्क आकारले जाईल.
  • लोन इन्शुरन्स पॉलिसी घेणे आवश्यक नाही.  
  • व्याजदर (Rate of Interest) 9.75%-10.25%.

5. YONO App प्री–एप्रूव्ड पर्सनल लोन (YONO App Pre-approved Personal Loan) 

पात्रता (Eligibility of YONO App Pre-approved Personal Loan)

  • एसबीआय सैलरी अकाउंट (sbi Salary Accounts) किंवा एसबीआय पेंशन अकाउंट असणे आवश्यक आहे. 
  • एसबीआय YONO App वरून तुम्ही या कर्जासाठी अर्ज करा

वैशिष्टे (Features of YONO App Pre-approved Personal Loan)

  • कमीत कमी कागदोपत्री व्यवहार 
  • कमी प्रोसेसिंग फी 
  • पूर्व-मंजूर कर्जे अर्जदाराच्या खात्यात त्वरित जमा केली जाते.

6. YONO App प्री–एप्रूव्ड पर्सनल लोन नॉन–सैलरीड (PAPL) (YONO App Pre-approved Personal Loan Non Salaried) 

पात्रता (Eligibility of PAPL)

  • एसबीआय सेविंग बैंक अकाउंट असणे आवश्यक आहे. 
  • एसबीआय YONO App वरून तुम्ही या कर्जासाठी अर्ज करा

वैशिष्टे (Features of PAPL)

  • 2 लाख रु. पर्यंतचे पर्सनल लोन मिळू शकते. 
  • व्याजदर (Rate of Interest) 12.60% पर्यंत.
  • कमीत कमी कागदोपत्री व्यवहार 
  • कमी प्रोसेसिंग फी 
  • पूर्व-मंजूर कर्जे अर्जदाराच्या खात्यात त्वरित जमा केली जाते.

एसबीआय पर्सनल लोन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required For SBI Personal Loan Application)

  • KYC Documents -पासपोर्ट, पॅन, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इत्यादी.  
  • 2-पासपोर्ट साइझ फोटो 
  • Income Proof – मागील सहा महिन्यांचे बैंक अकाउंट स्टेटमेंट,सैलरी स्लिप किंवा Income Tax Return

एसबीआय पर्सनल लोन स्टेटस चेक (SBI Personal Loan Status Check) कसे करावे? 

एसबीआय पर्सनल लोनसाठी अर्ज केल्या नंतर अँप्लिकेशन रिफरेन्स नंबर मिळतो. त्याचा वापर करून लोन स्टेटस जाणून पाहू शकता.

  • SBI Loan Status Check  या लिंक वर क्लिक करा. 
  • लोन अँप्लिकेशन रिफरेन्स नंबर नोंदवा. 
  • मोबाइल नंबर ISD कोड सोबत नोंदवा. 
  • ‘ट्रॅक’ बटणावर क्लिक करा

एसबीआय ग्राहक सेवा केंद्राला संपर्क कसा करावा (SBI Customer Care Number) ?

  • एसबीआय (sbi) कस्टमर केअर टोल-फ्री नंबर 1800-425-3800 आणि 1800-11-2211 आहेत
  • 8008202020 वर ‘UNHAPPY’ SMS करू शकता
  • ऑनलाइन ग्राहक तक्रार या https://crcf.sbi.co.in/ccf/ लिंकवर करू शकता
  • contactcentre@sbi.co.in वर इमेलवर पाठवू शकता

FAQ


एसबीआय पर्सनल लोनचा व्याजदर काय आहे ?

एसबीआय पर्सनल लोनचा व्याजदर 9.60% पासून सुरू होतो.

15000 पगारावर एसबीआय मध्ये मला किती लोन मिळू शकते ?

SBI कडून 15000 रु वर 3.6 लाख पर्यंतचे लोन मिळते

SBI मध्ये पर्सनल लोन साठी कसे अप्लाई करावे ?

YONO App प्री–एप्रूव्ड पर्सनल लोन
एसबीआय सैलरी अकाउंट (sbi Salary Accounts) किंवा एसबीआय पेंशन अकाउंट असणे आवश्यक आहे. 
एसबीआय YONO App वरून तुम्ही या कर्जासाठी अर्ज करा
वैशिष्टे (Features of YONO App Pre-approved Personal Loan)
कमीत कमी कागदोपत्री व्यवहार 
कमी प्रोसेसिंग फी 
पूर्व-मंजूर कर्जे अर्जदाराच्या खात्यात त्वरित जमा केली जाते.

बँकेत कर्ज कसे घ्यावे?

आपल्याला फक्त एक आयडी पुरावा (पॅन कार्ड, आधार कार्ड), पत्त्याचा पुरावा (भाडे करार, आधार कार्ड), उत्पन्नाचा पुरावा (बँक स्टेटमेंट) आणि छायाचित्र आवश्यक आहे. एकदा कागदपत्रे पूर्ण झाल्यावर, त्यांना तपासून काही तासांच्या आत तुमचे कर्ज बँक मंजूर करेल आणि तुमच्या पसंतीच्या खात्यात तुम्हाला काही दिवसात कर्ज मिळेल.

एसबीआय ग्राहक सेवा केंद्र फोन नंबर काय आहे ?

एसबीआय (sbi) कस्टमर केअर टोल-फ्री नंबर 1800-425-3800 आणि 1800-11-2211 आहेत


इतर वाचा –

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top