प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली सुरू केली होती. या योजनेअंतर्गत देशातील लोकांना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) अंतर्गत मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (MUDRA) कर्ज योजना हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे जी व्यक्ती, SME आणि MSMEs यांना कर्ज प्रदान करते. MUDRA अंतर्गत शिशू, किशोर आणि तरुण या 3 कर्ज योजना दिल्या जातात.
केंद्र सरकारने मुद्रा कर्जासाठी 3 लाख कोटी रुपयांचे बजेट तयार केले होते, त्यापैकी 1.75 लाख कोटी रुपयांचे कर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. MUDRA योजनेंतर्गत जास्तीत जास्त कर्जाची रक्कम 10 लाख रुपये आहे. तर कर्जाची किमान रक्कम निश्चित केलेली नाही. मुद्रा कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला बँका किंवा कर्ज संस्थांना कोणतीही हमी किंवा तारण देण्याची गरज नाही.मुद्रा कर्जाची परतफेड कालावधी 3 वर्षे ते 5 वर्षांपर्यंत EMI पर्यायांसह आहे. देशातील लोकांना या प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2022 अंतर्गत मुद्रा कर्ज घेण्यासाठी मुद्रा कार्ड देण्यात येते.

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2022 अंतर्गत, ज्यांना कर्ज घ्यायचे आहे त्यांना कर्ज घेण्यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही.जर कोणत्याही व्यक्तीला आपला व्यवसाय वाढवायचा असेल तर तो या योजनेअंतर्गत कर्ज देखील घेऊ शकतो. मित्रांनो, आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला या पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना 2022 शी संबंधित सर्व माहिती जसे की अर्ज प्रक्रिया, कागदपत्रे, पात्रता(Eligibility for mudra loan) इ. प्रदान करणार आहोत. तर आमचा लेख शेवटपर्यंत वाचा.
Table of Contents
मुद्रा लोनची वैशिष्ट्ये
- व्याज दर प्रत्येक बँकेचे वेगवेगळं, व्यवसाय आवश्यकतांवर अवलंबून असेल.
- हमी/सुरक्षा आवश्यक नाही
- कर्जाची किमान रक्कम निश्चित नाही
- कमाल कर्जाची रक्कम 10 लाखांपर्यंत
- परतफेड कालावधी 3 वर्षे ते 5 वर्षे
- प्रक्रिया शुल्क शून्य
- मुद्रा योजनेचे प्रकार शिशू, किशोर आणि तरुण
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण पैशाअभावी ते सुरू करू शकत नाहीत.अशा लोकांसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 2022 अंतर्गत लाभार्थी मुद्रा कर्ज घेऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकतात. आणि या योजनेंतर्गत लोकांना अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध होईल. Pradhanmantri Mudra Loan Scheme 2022 द्वारे देशातील लोकांची स्वप्ने साकार होणार आहेत आणि त्यांना स्वावलंबी आणि सशक्त बनवणे हा महत्वाचा उद्देश आहे.
मुद्रा कर्जाचे प्रकार
शिशु लोन: या अंतर्गत, अशा लोकांना कर्ज दिले जाते ज्यांना आपला व्यवसाय सुरू करायचा आहे आणि आर्थिक मदतीची गरज आहे. शिशु मुद्रा लोन योजना अंतर्गत जास्तीत जास्त ५०,००० रु. कर्ज, 10% ते 12% p.a. व्याजदर सह 5 वर्षांच्या परतफेडीच्या कालावधीसाठी दिले जाते.
किशोर लोन: हे कर्ज अशा लोकांसाठी आहे ज्यांनी आपला व्यवसाय आधीच सुरू आहे परंतु अद्याप स्थापित झालेला नाही. किशोर मुद्रा लोन योजना अंतर्गत 50,000 रु. ते 5 लाख दरम्यान कर्ज मिळू शकते. कर्ज परतफेडीचा कालावधी बँकेद्वारे निश्चित केला जातो. व्याजाचा दर कर्ज देणाऱ्या संस्थेनुसार बदलतो. बिझनेस प्लॅनसोबतच व अर्जदाराचा क्रेडिट रेकॉर्ड हे देखील व्याजदर ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
तरुण लोन: हे अशा लोकांसाठी आहे ज्यांनी स्वतःचा व्यवसाय स्थापन केला आहे पण विस्तारासाठी निधीची आवश्यकता आहे, तरुण मुद्रा लोन योजना अंतर्गत 5 लाख ते १० लाख दरम्यान कर्ज मिळू शकते. व्याज दर आणि परतफेड कालावधी अर्जदाराच्या क्रेडिट रेकॉर्डवर अवलंबून आहे.
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेचे फायदे
- व्यावसायिक वाहने : ऑटो-रिक्षा, ट्रॉली, टॅक्सी, ट्रॅक्टर, माल वाहतूक करणारी वाहने, 3-व्हीलर, ई-रिक्षा इत्यादी व्यावसायिक वाहनांच्या खरेदीसाठी.
- सर्विस सेक्टर : जिम, टेलरिंगची दुकाने, सलून, औषधांची दुकाने, दुरुस्तीची दुकाने आणि ड्राय क्लीनिंग आणि फोटोकॉपी दुकाने इत्यादींचा व्यवसाय सुरू करणे.
- फूड आणि वस्त्र उत्पादन क्षेत्र : संबंधित क्षेत्रातील विविध उपक्रमांसाठी.
- व्यापारी आणि दुकानदारांसाठी : दुकाने, सेवा उपक्रम, व्यापार आणि व्यावसायिक क्रियाकलाप आणि बिगरशेती उत्पन्न निर्माण करणारे उपक्रम.
- लहान व्यवसायांसाठी इक्विपमेंट फायनान्स योजना : कमाल 10 लाख रुपयांपर्यंत.
- कृषी-संलग्न उपक्रम : कृषी-क्लीनिक आणि कृषी व्यवसाय केंद्रे, अन्न आणि कृषी-प्रोसेसिंग युनिट, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, मधमाशी पालन, वर्गीकरण, पशुधन-पालन, प्रतवारी, कृषी-उद्योग, डायरी, मत्स्यपालन इत्यादी व्यवसायांशी संबंधितसाठी.
मुद्रा कर्ज योजना पात्रता
Eligibility for mudra loan खालील प्रमाणे-
- अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
- ज्या व्यवसायासाठी मुद्रा कर्ज घ्यायचे आहे ती कॉर्पोरेट संस्था नसावा.
- व्यवसायाचा आराखडा तयार करावा.
- मुद्रा कर्ज अर्जदाराचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
मुद्रा लोनसाठी लागणारी कागदपत्रे
Mudra loan eligibility documents खालील प्रमाणे-
- एप्लीकेशन फॉर्म
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- अर्जदार आणि सह-अर्जदारांची KYC कागदपत्रे
- रहिवासाचा पुरावा – आधार कार्ड / पासपोर्ट / मतदार कार्ड / टेलिफोन बिल / बँक तपशील
- ओळखीचा पुरावा – आधार कार्ड / मतदार कार्ड / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स
- आईटीआर, सेल्स टैक्स रिटर्न, परवाना, नोंदणी
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना अर्ज कसा करावा?
Pradhan mantri mudra yojana application form अर्ज खालील प्रमाणे करावा-
- या योजनेंतर्गत, कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने आपल्या जवळील सरकारी बँक, खाजगी बँक, ग्रामीण बँक आणि वाणिज्य बँक इत्यादींमध्ये त्यांच्या सर्व कागदपत्रांसह अर्ज करू शकतात.
- यानंतर, ज्या बँकेतून तुम्हाला कर्ज घ्यायचे आहे तेथे जा आणि अर्ज भरा.
- फॉर्म सोबत तुमचे सर्व कागदपत्रांसह जोडा आणि बँकेच्या अधिकाऱ्याकडे सबमिट करा.
- तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर, बँक तुम्हाला 1 महिन्याच्या आत कर्ज देईल.
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजना 6 वर्षे पूर्ण
- गेल्या 6 वर्षात आतापर्यंत 28.68 लाभार्थ्यांना प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेद्वारे 14.96 लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. 2015 ते 2018 या कालावधीत या योजनेद्वारे सुमारे 1.12 कोटी अतिरिक्त नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत.
- या योजनेतून लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. सन 2020-21 मध्ये सरकारने 4.20 कोटी लाभार्थ्यांना कर्ज दिले. 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 19 मार्च 2021 पर्यंत लाभार्थ्यांना 2.66 लाख कोटींचे वाटप करण्यात आले आहे.
- प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत सुमारे 88% शिशू कर्जे प्रदान करण्यात आली. 24% नवीन उद्योजकांना कर्ज दिले गेले. 68% कर्जे महिलांसाठी आणि 51% कर्जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि मागासवर्गीय नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. याव्यतिरिक्त, अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना सुमारे 11% कर्ज प्रदान करण्यात आले.
मुद्रा कार्ड म्हणजे काय?
मुद्रा कार्ड हे एक प्रकारचे डेबिट कार्ड आहे जे मुद्रा कर्जासाठी अर्ज करतात त्यांना दिले जाते. जेव्हा कर्ज अर्जदार मुद्रा कर्जासाठी अर्ज करतो आणि कर्ज मंजूर झाल्यास, त्याचे/तिचे मुद्रा कर्ज खाते उघडले जाते आणि त्यासोबत डेबिट कार्ड पण दिले जाते. कर्जाची रक्कम मुद्रा खात्यात जमा केली जाते आणि कर्ज अर्जदार मुद्रा कार्ड वापरून त्यांच्या मुद्रा खात्यातून रक्कम काढू शकतात
मुद्रा कर्ज देणाऱ्या बँक
Mudra loan bank list 2022 खालील प्रमाणे –
इलाहाबाद बँक | सेंट्रल बँक ऑफ इंडिया | इंडियन ओवरसीज़ बँक | सारस्वत बँक |
आंध्रा बँक | कॉर्पोरेशन बँक | जम्मू एंड कश्मीर बँक | स्टेट बँक ऑफ इंडिया |
एक्सिस बँक | फेडरल बँक | कर्नाटक बँक | सिंडीकेट बँक |
बँक ऑफ बड़ौदा | HDFC बँक | कोटक महिंद्रा बँक | तमिलनाड मर्सेंटाइल बँक |
बँक ऑफ इंडिया | ICICI बँक | ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स | UCO बँक |
बँक ऑफ महाराष्ट्र | IDBI बँक | पंजाब एंड सिड बँक | यूनियन बँक ऑफ इंडिया |
केनरा बँक | इंडियन बँक | पंजाब नेश्नल बँक | यूनाइटेड बँक ऑफ इंडिया |
मुद्रा योजना अधिकृत वेबसाइट ?
मुद्रा लोन योजना हेल्पलाइन नंबर
महाराष्ट्र : 18001022636
FAQ
मुद्रा लोन किती दिवसात मिळते?
मुद्रा लोन ची प्रोसेस एक दोन आठवड्यांत पूर्ण होते.
मुद्रा लोनसाठी काय डॉक्यूमेंट आवश्यक आहेत ?
आयडेंटिटी प्रूफ: आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, आयडी कार्ड, ड्राइव्हिंग लाइसेंस इ. एड्रेस प्रूफ: लाइट बिल, आधार कार्ड, मान्य पासपोर्ट, डोमिसाइल सर्टिफिकेट, मतदार आयडी इ.
प्रधानमंत्री मुद्रा लोन चे किती प्रकार आहेत ?
शिशु लोन – ५० हजार पर्यंत व्यवसाय लोन
किशोर लोन – ५० हजार ते ५ लाखांपर्यंत व्यवसाय लोन
तरुण लोन – 5 लाख ते 10 लाखांपर्यंत व्यवसाय लोन
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
स्टेप 1: मुद्रा लोन फॉर्म डाउनलोड करा
स्टेप 2: लोन फॉर्ममध्ये योग्य माहिती भरणे.
स्टेप 3: कोणतीही सार्वजनिक किंवा प्राइवेट बँक जाऊ शकता जी मुद्रा लोन देते.
स्टेप 4: बँकच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करा.
स्टेप 5: त्यांनंतर तुमचे लोन पास होईल